BEST Bus On  Special Report
BEST Bus On Special Report BEST Bus On Special Report

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

बेस्ट बस उत्पन्नात वाढ: मुंबईकरांसाठी बेस्ट बसचा प्रवास अधिक फायदेशीर.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईकरांसाठी बसचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. बेस्टच्या बसचा मोठा आधार मुंबईकरांना आहे. मात्र हाच बेस्ट उपक्रम गेल्या 20 वर्षांपासून तोट्यात आहे आणि हा तोटा दरवर्षी वाढतोय. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यातल्या त्यात दिलाशाची गोष्ट सांगितलीय आणि ती आहे बेस्टच्या रोजच्या उत्पनाबाबतची वाचूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट

मुंबईकरांच्या सेवेत दोन जीवनवाहिन्या आहेत. एक आहे मुंबईची लोकल, तर दुसरी आहे बेस्टची बस लोकलने स्टेशनपर्यंत पोहोचायचं आणि तिथून घरापर्यंत जायचं, असा मुंबईकरांचा शिरस्ता असतो. मात्र बेस्टची बस अगदी घराच्या जवळ पोहोचवते. म्हणूनच तर मुंबईकर बेस्टच्या प्रवासालाही पसंती देतात. म्हणूनच बेस्टच्या हजारो बस रोज मुंबईकरांच्या सेवेसाठी धावतात.

हेडर- बेस्टची ताकद किती?

बेस्टच्या ताफ्यात तब्बल 2 हजार 594 बस

एकूण ताफ्यातील 17 टक्के बस स्वमालकीच्या

याचाच अर्थ अवघ्या 437 बस बेस्टच्या मालकीच्या

उर्वरित 2 हजार 157 बस भाडेतत्वावर घातलेल्या

तर दुसरीकडे बेस्ट उपक्रम तोट्यात आहे... गेल्या 22 वर्षांत बेस्ट उपक्रमाचा तोटा 13 हजार कोटी रुपयांवर गेलाय.

हेडर- बेस्टचा तोटा किती?

बेस्टवर अडीच हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज

बेस्टला दर महिन्याला सुमारे 200 कोटींचा तोटा

बेस्टला दरवर्षी सुमारे 900 कोटींचा तोटा

त्यातच 15 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या बस भंगारात जमा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी सध्याच्या बस या अपुऱ्या असल्याचा आरोप होत असतो. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत चलो अॅप, दैनिक, मासिक, वार्षिक पाससारखे उपक्रम राबवल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झालीय. त्यामुळे बेस्टचा रोजचा गल्ला चांगलाच वाढलाय. बेस्टचं रोजचं उत्पन्न सध्या सुमारे 1 कोटींनी वाढलंय. तशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलीय.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "एकूणच, मुंबईकरांची लाडकी बेस्टची बस तोट्यात आहे... मुंबईकरांना आपल्या कुशीत घेऊन फिरणाऱ्या बसला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे बेस्टचं उत्पन्न असंच वाढत राहो, आणि बेस्ट नफ्यात येवो, हीच मुंबईकरांची अपेक्षा आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com