2 हजाराची नोट बंद होणार; केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड म्हणाले, आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय...
Admin

2 हजाराची नोट बंद होणार; केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड म्हणाले, आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.

याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भागवत कराड म्हणाले की, आता हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहार माहिती झाले आहेत. त्यामुळे बँकेतील व्यवहार डिजीटल माध्यमातून होत आहे. आरबीआय ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, आपल्याकडे असणाऱ्या २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकेत जमा करा. त्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी ६ महिन्याचा वेळ आहे. असे भागवत कराड म्हणाले.

2 हजाराची नोट बंद होणार; केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड म्हणाले, आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय...
नोटबंदी 2.0! RBI चा मोठा निर्णय; 2 हजाराची नोट बंद होणार, 'या' तारखेपर्यंत करा बॅंकेत जमा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com