Crime News
Crime NewsTeam Lokshahi

बलात्काराने पुन्हा हादरला भंडारा; पवनीच्या रिसॉर्टमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार

भंडारा जिल्ह्यात सामूहिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच या प्रकाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
Published by :
Sudhir Kakde

नात्यातल्याच 19 वर्षीय तरुणीला फिरायला जाऊ असा बहाणा करून एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पीडितेला भंडारा जिल्ह्याच्या पवनीच्या रिसॉर्टवर नेलं. तिथे तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात सामूहिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच या प्रकाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोनू सुरेश नान्हे (22) रा. पवनी असं अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे.

आरोपी सोनू हा पीडितेच्या चुलत मामाचा मुलगा आहे. पीडिता ही भंडारा तालुक्यातील असून तिला दोन मामा आहेत. ते पवनी येथे राहतात. त्यांच्या घराशेजारी चुलत मामा सुरेश नान्हे राहतात. पीडिता ही अधूनमधून मामाकडे पवनीला जात असायची. त्यामुळे तिची आरोपी सोनुसोबत ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर असल्यानं ते मागील अडीच वर्षांपासून संपर्कात होते. 7 ऑगस्टला आरोपी सोनू हा पीडितेच्या गावातील शाळेजवळ पोहचला, तिथून त्याने फोन करून पीडितेला फिरायला जाऊ असं सांगितलं. नकार दिल्यानंतरही आरोपीने तिला भुलथापा देत दुचाकीवर बसवून फिरायला नेलं. त्यानंतर लाखांदूर येथील दुर्गा मंदिरात तिला नेऊन तिथे सायंकाळपर्यंत दोघेही थांबले. रात्र होत असल्यानं त्याने पीडितेला चप्राड येथे त्याच्या बहिणीकडे भाऊजीला बोलावून पोहोचवलं. दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्टला आरोपी सोनवणे पीडितेला लाखांदूर येथून पवनीला आणले. तहसील कार्यालयाजवळील टायगर रिसॉर्ट मधील 102 नंबरची रूम बुक करून तिथे तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

Crime News
भीषण अपघाताचा व्हिडिओ; बसची वाट पाहत थांबलेल्या कुटुंबाला बसनेच उडवले

दरम्यान, पीडितेने विरोध केला असता ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. रात्री 10 वाजताच्या सुमारास सोनुने चारचाकी वाहनाने पीडितेला शाळेजवळ सोडल्याची माहिती तक्ररीत नमूद आहे. घरी पोहोचताच पीडितेने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी मंगळवारी पीडितेने कारधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, घटनास्थळ हे पवनी येथील असल्यानं प्रकरण वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com