Crime News
Crime NewsTeam Lokshahi

Bhandara : सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी कमांडट रागसुधा आर गोंदियात

जिल्ह्यातील नऊ पोलीस अधिकारी असणार पथकात; पहिल्याच दिवशी घेतली प्राथमिक माहिती
Published by :
Sudhir Kakde

गोरेगाव तालुक्यातील एका 35 वर्षाच्या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून, जनसामान्यांकडून याबद्दल संताप व्यक्त केला जातोय. प व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील निर्भयापेक्षाही हे प्रकरण क्रुर असल्याने या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी जालनाच्या राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर ह्या 8 ऑगस्ट रोजी गोंदियात दाखल झाल्या आहेत.

सामूहिक बलात्कार प्रकरानंतर दोन्ही जिल्ह्यातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला. यासाठी राज्य राखीव दलाच्या कमांडंट रागसुधा आर यांची नियुक्ती केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास कारण्यासाठी त्यांच्या मदतीला गोंदिया जिल्ह्यातून तीन अधिकारी व सहा पोलीस कर्मचारी असे नऊ लोक देण्यात आले आहेत. यात एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीकडून किती कर्मचारी दाखल झाले याची माहिती देण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. रागसुधा यांनी आज सोमवारी जिल्ह्यात दाखल होत तातडीने या प्रकरणाच्या तपास कार्याला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक माहिती आणि घटनेचे बारकावे सुध्दा त्यांनी जाणून घेतल्याची माहिती आहे.

Crime News
शरद पवार, अजित पवारांसह सुप्रिया सुळेंना लवासा प्रकरणी नोटीस

दरम्यान, हे प्रकरण निष्काळजीपूर्वक हातळल्यानं लाखनी येथील दोन पोलिसांना सोमवारी तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे. तर महिला पोलीस कर्मचाऱ्याची मुख्यालयात बदली करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तपासात आणखी काय तथ्य पुढे येतात याकडे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं आह

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com