Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मातृदिनानिमित्त भावनिक क्षण

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर मातृदिनी झाला भावूक ; पोस्ट शेअर करत केली कृतज्ञता व्यक्त

सचिन तेंडुलकर: मातृदिनानिमित्त आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावनिक क्षण शेअर.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी मातृदिनाच्या निमित्ताने (मदर्स डे) आपल्या कुटुंबासोबतचा एक खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते आपल्या आई रजनी तेंडुलकर, भावंडं व कुटुंबीयांसमवेत एकत्र दिसत आहेत. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर हे मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये खास दिसत आहेत.

सचिन यांनी सोशल मिडियावर लिहिलं आहे :

"मी आज सर्व काही आज आहे, ते आईच्या प्रार्थना आणि तिच्या शक्तीमुळेच शक्य झालं आहे. माझी आई नेहमीच माझं आधारस्तंभ राहिली आहे, जशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी असते. सर्व अविश्वसनीय मातांना माझ्याकडून मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

दरम्यान, सचिन तेंडुलकर यांचे आईविषयीचे खास प्रेम हे नेहमी चर्चेत राहिले आहे. ते वेळोवेळी विविध माध्यमांतून आपल्या आईबद्दलची भावना अत्यंत मनापासून व्यक्त करत असतात. त्यांच्या जीवनात आईचे स्थान किती महान आहे, हे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे. या फोटोमध्ये सचिन यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या भावंडांपैकी अजीत तेंडुलकर आणि नितीन तेंडुलकर यांचीही उपस्थिती आहे. त्यांच्या आईप्रती असलेली कृतज्ञता आणि कुटुंबातील बंध याचे हे एक जिवंत उदाहरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com