शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? पंकजा मुंडे म्हणाल्या...
Admin

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? पंकजा मुंडे म्हणाल्या...

शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.

शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांचा हा एकत्र केलेला प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी यावरुन प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार आणि देवेंद्र फडणीसांचा एकत्र प्रवास नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? यावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “शरद पवार वरिष्ठ आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पवारांच्या गाडीत बसले असतील तर तो त्यांचा नम्रपणा आहे, असं मला वाटतं. असे त्या म्हणाल्या.

याशिवाय त्या म्हणाल्या की, एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं, त्याच्या कुठल्या समारंभाला जाणं, त्याच्याबरोबर गाडीत बसणं या गोष्टींचा काही अर्थ लावण्याची गरज नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आज मंचावर होतो.“मला वाटतं त्यात काही राजकारणाची नांदी नसेल. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या आधी भारती विद्यापीठ परिसरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या गाडीतून एकत्र प्रवास करत संस्थेची पाहणी केली. मेडिलल कॉलेजचे गेस्ट हाऊस ते लेडीज होस्टेलपर्यंत पवार आणि फडणवीसांनी एकत्रित प्रवास केला. यावेळी गाडीमध्ये मागील सीटवर पवार आणि फडणवीस होते, तर पुढच्या सीटवर शिवाजीराव कदम होते. मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून जात असताना चला माझ्यासोबत... असं पवार फडणवीसांना म्हणाले. त्यानंतर फडणवीस पवारांच्या गाडीत बसले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com