Admin
बातम्या
“अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही” - भास्कर जाधव
शिवसेनेच्या व्हिपवरुन राडा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या व्हिपवरुन राडा होण्याची शक्यता आहे. व्हिपवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हिप जारी करण्यात आला आहे.
व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. यावरुन ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आमची सुरक्षा काढण्यात आली, अशी गोष्टींना आम्ही घाबरलो नाही, तर यांच्या व्हीपला आम्ही कसे घाबरणार? असे कित्येक व्हीप आम्ही बघितले. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही. असे भास्कर जाधव म्हणाले.