Bhaubij 2025 : 'या' वर्षी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी
Bhaubij 2025 : 'या' वर्षी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्वाचे धार्मिक उपायBhaubij 2025 : 'या' वर्षी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्वाचे धार्मिक उपाय

Bhaubij 2025 : 'या' वर्षी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्वाचे धार्मिक उपाय

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरा केला जाणारा भाऊबीज हा सण या वर्षी 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरा केला जाणारा भाऊबीज हा सण या वर्षी 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण भावंडांच्या प्रेमाचे आणि स्नेहबंधाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर चंदन, केशर किंवा कुमकुमाचा टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींना प्रेम आणि जिव्हाळ्याचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात.

धार्मिक कथेनुसार, या दिवशी यम आणि त्याची बहीण यमुना यांची भेट झाली होती, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते.

राहुकालाची वेळ

द्रिक पंचांगानुसार 23 ऑक्टोबर रोजी राहुकाल दुपारी 1:30 ते 2:54 या वेळेत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाल हा अशुभ मानला जातो, त्यामुळे या काळात ओवाळणीसारखी शुभ कार्ये टाळावीत.

भाऊबीजचे शुभ मुहूर्त

पहिला मुहूर्त: दुपारी 1:13 ते 3:28

अभिजित मुहूर्त: सकाळी 11:43 ते 12:28

विजय मुहूर्त: दुपारी 1:58 ते 2:43

गोधूली मुहूर्त: सायंकाळी 5:43 ते 6:09

भाऊबीजचे शुभ उपाय

भाऊबीजेला ओवाळणी करताना चंदन किंवा केशराचा टिळा लावल्याने भावाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता टिकून राहते, असा धार्मिक समज आहे. तसेच या दिवशी यमाचा दिवा पेटवणे हे अकाल मृत्यूच्या भयापासून मुक्ती देते, असेही मानले जाते.

हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून भावंडांच्या प्रेम, विश्वास आणि एकतेचा सुंदर उत्सव आहे.

टीप: ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. याची वैज्ञानिक पडताळणी आम्ही करत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com