Bhausaheb Rangari Ganpati Visarjan : पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक; वैशिष्ट्ये काय?
देशातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बापाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या श्री गणेश रत्न रथा मधून निघणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या उपस्थितीत गणेशाची पूजा होईल, त्यानंतर सकाळी 8 वाजता रत्नमाला मंडपातून श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बापाची विसर्जन मिरवणूक निघेल.
श्री गणेश रत्नरथ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल आणि टिळकांच्या पुतळ्याकडे सकाळी 9.30 वाजेपर्येत पोहचेल. येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विसर्जनासाठी येणा-या पुण्याच्या मानाच्या पाच ही गणपतीला पुष्पहार घातला जाईल.
त्यानंतर दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बापाची वैभवशाली मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल.
या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने श्री गणेश रत्न सजवलेला आला असून या रतासमोर श्रीराम आणि रमणबाग ही ढोल ताशा पथके पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या जोरदार वादन करणार आहेत रात्री 11:00 वाजता श्रीच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.