Income Tax
Income Tax

Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरातील 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी

संपूर्ण देशात आयकर विभागाने धडक कारवाई करत देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

( Income Tax ) संपूर्ण देशात आयकर विभागाने धडक कारवाई करत देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली असून यातून बऱ्याच लोकांवर कर थकवल्याच्या कारणावरून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची (Income tax department) कारवाई सुरु आहे. देशातील आयकर विभाग सक्रिय झाला असून त्यांनी वेगवगेळ्या शहरांमध्ये जवळजवळ 200 ठिकणी एकाचवेळी छापेमारी केली आहे. आयटी रिटर्नमध्ये घोटाळा करून कर चोरी करण्याऱ्या संस्था आणि व्यक्तींमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी अनेक व्यक्ती आणि संस्था आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा सुद्धा समावेश आहे. येथील एका फार्मची सुमारे 17 तास चौकशी करण्यात आली. देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम 80जी अन्वये 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय या फर्मवर आहे. यामुळे आयकर विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेत देशभरात धडक कारवाईला सुरूवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com