कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदान देणार - मुख्यमंत्री

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदान देणार - मुख्यमंत्री

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्राह अनुदान देणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.

देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com