Amitabh Bachchan: बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल; कोकिलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी

Amitabh Bachchan: बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल; कोकिलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी

१६ मार्च रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. आज १६ मार्च रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अमिताभ बच्चन किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी, रिपोर्टनुसार आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या तब्येतीमुळे खूप चर्चेत आहेत. अलीकडेच त्याच्या पायाला दुखापत झाली होती. आज त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी येत आहे. या सगळ्या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विटही केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये ‘सदैव कृतज्ञ’ असं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट व्हायरल झालं असून चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत

दरम्यान, सध्या अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. त्यांना अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. या प्रकरणी अद्याप कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या अमिताभ बच्चन यांच्यावर डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com