Thane : ठाण्यातील मुंब्रा येथील चांदनगरमध्ये मोठा ब्लास्ट

Thane : ठाण्यातील मुंब्रा येथील चांदनगरमध्ये मोठा ब्लास्ट

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील चांदनगर येथील मुघल पार्क ईमारतीमध्ये भयानक स्फोट झाला
Published by :
Siddhi Naringrekar

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील चांदनगर येथील मुघल पार्क ईमारतीमध्ये भयानक स्फोट झाला असून, या स्फोटामुळं एक किलोमीटरचा परिसर हादरुन गेलाय. या स्फोटात सुमारे सहा ते आठ दुकाने व आसपासच्या गाड्या तसंच आजूबाजूच्या इमारतीचं नुकसान झाल्याचं समजते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या स्फोटाप्रमाणे घटना घडल्याचं समजतं. यामध्ये दहा जणांना दुखापत झाली असून त्यामध्ये पुरुष महिला व लहान बाळांचा सुद्धा समावेश आहे. ज्यामध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मात्र हा ब्लास्ट नेमका झालाय कसा हे अद्यापही कळालेलं नसलेलं तरी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com