Eknath Shinde
Eknath Shinde Eknath Shinde

Eknath Shinde : महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा

पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे अडीचशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यात महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे आणि यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप युती करू शकतात. तथापि, काही ठिकाणी जिथे भाजप आणि शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार नाहीत, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच महायुतीमध्ये असलेल्या काही नेत्यांची नाराजी समोर येत आहे, विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे अडीचशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत. या कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाचे नेता रवींद्र धंगेंकर हे कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांचा नाराजगी व्यक्त करत सांगितले की, "आम्हाला फसवणूक केली आहे, आम्हाला फक्त आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे, आणि भाजपच्या दबावामुळे हे सगळं घडत आहे."

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. यामध्ये भाजपला सर्वात जास्त सदस्यांची भर पडली. याचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसला. शिवसेना शिंदे गटाने यावर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात जाहीरपणे सांगितले की, "आम्ही इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आमच्यात घेत नाही." तरीही, इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेशाची प्रक्रिया जोरात सुरू आहे.

थोडक्यात

  1. राज्यात महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू

  2. सर्व राजकीय पक्षांकडून बैठकांचा जोर

  3. मुंबई व प्रमुख शहरांत भाजप–शिवसेना शिंदे गट युतीची शक्यता

  4. काही ठिकाणी भाजप–राष्ट्रवादी अजित पवार गट युती संभव

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com