Uddhav  Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमधून मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमधून मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) ला नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) ला नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असून ते मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर त्यांनीच पुष्टी दिली आहे.

अद्वय हिरे यांचा प्रवेश हा नाशिकच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंत्री दादा भुसे यांना कडवे आव्हान दिले होते. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील सत्ता गणितात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

यापूर्वी अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे यांनीही महायुतीकडे झुकाव दाखवला होता. आता अद्वय हिरेही भाजपमध्ये दाखल होणार असल्याने ठाकरे गटाला आणखी फटका बसला आहे. दरम्यान, २ डिसेंबरला नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्याआधीच झालेली ही राजकीय हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com