Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला (Microsoft Satya Nadella) यांची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली. आजच्या या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबई पोहोचले होते.

मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्टसोबत GCC Global Capability Centers (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर) हा महत्वकांशी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी उभारण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

45 हजार लोकांना मिळणार रोजगार

45 हजार लोकांना जीसीसीद्वारे रोजगार उपलब्ध होतील. सामंजस्य करार याबाबत लवकरच करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. बैठकीत प्राईम AI OS ची चित्रफीत दाखवली. AI इतर क्षेत्रात कसा वापर करता येईल त्यांसदर्भात चर्चा झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन टेक कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या निधीचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटर यांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केला जाईल. मायक्रोसॉफ्ट 1.57 लाख कोटी भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी गुंतवत आहे. ही आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यामुळे भारतात AI साठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होतील, लाखो लोकांना नवीन कौशल्ये शिकवली जातील आणि आपला डेटा आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची ताकदही मिळेल. AI-युक्त भारताच्या भविष्यासाठी हेच हवे होते, असं सत्या नडेला यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com