Share Market : शेअर बाजारात आज मोठी घसरण, सेन्सेक्स 3 हजार 400 अंकांनी कोसळला
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सलग तीन दिवस अमेरिकन बाजारांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. तसेच अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांना बसला आहे. तसेच याचा फटका भारतीय शेअर मार्केटला देखील बसलेला पाहायला मिळाला.
यावेळी सेन्सेक्स 2,743 अंकांनी कोसळला असून निफ्टी 900 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स तब्बल 3 हजार 400 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणुकदारांचे कोटींचे नुकसान झाल असून भारतीय गुंतवणुकदारांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. तसेच यामुळे आयटी कंपन्यांना देखील सर्वाधिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्क्यांनी खाली घसरले आहेत.
त्याचसोबत आशियाई बाजारात 10% घसरण झाल्याची माहिती आहे. तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला असून जपान आणि हाँगकाँग मधील शेअर मार्केट देखील 9 टक्क्यांनी घसरलं आहे. त्याचसोबत ऑस्ट्रेलियाचा शेअर मार्केटमध्ये 6.4 टक्क्यांनी घसरण झाली असून सिंगापूर शेअर मार्केटमध्ये 5.5 टक्क्यांनी तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे.