Gold Rate : सोन्याच्या दरात मोठे बदल ! जाणून घ्या सोने-चांदीचा भाव काय
गेल्या अनेक महिन्यांपासून सोने व चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत होती सोन्याने 91000 चा टप्पा हा पार केला होता. त्यानंतर चांदीने देखील एक लाख एक हजार रुपयांचा टप्पा पार केल्याचा पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
सोन्याचा भाव 359 रुपयांनी वाढून 91,076 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तसेच चांदीच्या भावातही वाढ होत आहे. चांदीच्या किमतीत 500 रुपयांहून अधिक वाढ होत आहे. तसेच सोन्याचा भाव 683 रुपयांनी वाढला आणि 91,400 रुपयांच्या उच्चांकावर गेला. त्याचसोबत चांदीची किंमत देखील 1,00,975 रुपयांवर पोहोचली आहे.
चालू वर्षात चांदीच्या भावात 11,909 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात 3400 रुपयांहून अधिक वाढ झाली असून चांदीच्या भावात सुमारे 3,500 रुपयांची वाढ झाली आहे. तर महिन्याभरात सोन्याच्या भावात 5,239 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या भावात 4,900 रुपयांची वाढ झाली आहे.