Maharashtra Election 2025 Date : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आज पार पडलेल्या निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयानुसार लवकर निवडणुका घ्या असे निर्देश देण्यात आले असून राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यातून 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये 10 नवीन नगरपरिषदाांचा समावेश आहे. त्याचसोबत 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यादरम्यान 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश असून अजून 105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाही. त्याचसोबत पंचायतची बहु सदस्य पद्धतीने निवडणूक होणार. नगर परिषदामध्ये विषम संख्येत एका प्रभागात तीन जागा असतात. नगर परिषदा एका नगराध्यक्ष पदासाठी देखील मतदान करावे लागतील.

