मोठी बातमी! पुढील 72 तास लोकशाही वृत्तवाहिनी राहणार बंद, कारण...

किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनेलवर मोठी कारवाई केली आहे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती कमलेश सुतार यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com