Artificial Intelligence : मोठी भविष्यवाणी! AI युगात गरिबी संपेल, पैशांची गरज राहणार नाही...
AI युगात गरिबीचे अस्तिस्त संपलेले असेल, पैशांची गरज राहणार नाही तसेच नोकरी करणे हा केवळ एक छंद राहिलं असा मोठा दावा टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी केला आहे. एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासोबत मस्क अमेरिका-सौदी गुंतवणूक परिषदेत मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समुळे जग कशा पद्धतीने बदलेलं असेल, याचा परिचय करून देत ही भविष्यवाणी केली आहे.
पैसा संपष्टात येईल अन् त्याची जागा AI घेईल
येणाऱ्या काळात एआय आणि रोबोटिक्स इतके प्रगत झालेले असेल की, लोकांना पैसा महत्त्वाचा राहणार नाही. मनुष्याला फक्त वीज आणि संसाधनांची आवश्यकता असेल, परंतु व्यवहारांच्या पारंपारिक संकल्पना अप्रासंगिक होतील असेही मस्क यांनी एका पॅनेल चर्चेत सांगितले. यावेळी मस्क यांनी विज्ञान कथा लेखक इयान बँक्स यांच्या “कल्चर सिरीज” चा हवाला दिला. ते म्हणाले की, ही पुस्तके अशा भविष्याची झलक देतात जिथे तंत्रज्ञान जवळजवळ प्रत्येक मानवी गरज पूर्ण करेल.
नोकरी फक्त एक पर्याय असेल, गरज नाही
AI च्या विस्तारामुळे एकीकडे नोकऱ्यांवर टांगती तलवार उपस्थित झाली आहे. यावर भाष्य करताना मस्क म्हणाले की, भविष्यात नोकरी गरजेपेक्षा छंद म्हणून केली जाईल. लोकं फक्त आवड म्हणून नोकरी करतील. हा बदल समाजाच्या रचनेत मूलभूतपणे बदल करेल आणि लोकांच्या भूमिका पूर्णपणे बदलेल असेही मस्क म्हणाले.
जगातील गरीबी संपलेली असेल
जेव्हा रोबोट सर्व कामं हाती घेतील तेव्हा सरकारला युनिव्हर्सल हाय इन्कम प्रदान करावे लागेल, जे साध्या मूलभूत उत्पन्नापेक्षा खूप जास्त असेल. त्यानंतर आता मस्क यांनी एआय आणि रोबोटिक्स, विशेषतः टेस्लाच्या ऑप्टिमस रोबोटसारख्या प्रणाली जगातून गरिबी दूर करतील असा दावा केला आहे. मस्क यांनी जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, भविष्यात लोक कोणतेही उत्पादन आणि सेवा सहजपणे मिळवू शकतील, जरी या मोठ्या बदलादरम्यान अनेक सामाजिक आव्हाने आणि तणावदेखील उद्भवू शकतात असे मस्क यांनी म्हटलयं.
