FASTag : FASTag नसलेले वाहनचालक मोठा दिलासा! काय आहे नवीन नियम ?
थोडक्यात
केंद्र सरकारने फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा
दुप्पट टोलऐवजी फक्त 1.25 टक्के टोल भरावा लागणार
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे मुख्य उद्देश
केंद्र सरकारने फास्टॅग (FASTag) नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या घोषणेनुसार आता, जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा ते काम करत नसेल, तर टोल प्लाझावर रोखीने दुप्पट टोल कर भरण्याऐवजी वाहनचालक UPI वापरून पैसे भरू शकणार आहेत. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना यासाठी दुप्पट टोलऐवजी फक्त 1.25 टक्के टोल भरावा लागणार आहे. याबाबत अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे. ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाणार आहे.
जुन्या नियमांनुसार, जर एखाद्या वाहन चालकाकडे फास्टॅग नसेल किंवा तो वैध नसेल, तर त्याला सामान्य टोल शुल्काच्या दुप्पट रोखीने टोल द्यावा लागत होतो. जो एक मोठा दंड मानला जात असे. मात्र, आता फास्टॅग नसलेली किंवा निष्क्रिय फास्टॅग असलेली वाहने UPI द्वारे 1.25 पट टोल शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ असा की, UPI द्वारे पैसे भरताना वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारला जाणार नाहीये. उदाहरणार्थ, जर टोल शुल्क 100 रूपये असेल, तर पूर्वी फास्टॅग नसल्याबद्दल दंड म्हणून 200 रूपये भरावे लागत होते. मात्र, आता जर तुम्ही UPI वापरून पैसे दिले तर, तुम्हाला फक्त 125 रूपये द्यावे लागतील.
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे मुख्य उद्देश
टोल वसुली वाढवण्यासाठी आणि ती अधिक ग्राहक-अनुकूल बनवण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल, तर टोल प्लाझावरील फसव्या व्यवहारांनाही आळा बसेल, ज्यामुळे टोल वसुली वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, या नवीन सुविधेमुळे टोल प्लाझावर वाया जाणारा अतिरिक्त प्रवास वेळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या, देशात FASTag चा वापर सुमारे 98% पर्यंत पोहोचला आहे.