Mumbai High Court : जरांगे पाटलांना मोठा दिलासा, जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

Mumbai High Court : जरांगे पाटलांना मोठा दिलासा, जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Mumbai High Court) यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे फलित म्हणजे शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • जरांगे पाटलांना मोठा दिलासा

  • 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही

  • जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे फलित म्हणजे शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी, संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.

परंतु, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, राज्य सरकारने केलेल्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटियरच्या शासन आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे राज्य सरकारला देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टाचे मुख्य न्या. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, हायकोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

राज्यातील कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून हैदराबाद गॅझेटिरविरुद्ध रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांसंदर्भात आज सुनावणी झाली, त्यावर 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com