Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा; स्फोट झालेल्या कारमध्ये होता दहशतवादी उमर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Delhi Blast ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे.
या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कसा झाला? याचा तपास आता घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन माहिती समोर येत आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा झाला असून स्फोट झालेल्या कारमध्ये दहशतवादी उमर असल्याची आता माहिती मिळत आहे.
कारच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी उमरच्या कुटुंबातील सदस्यांच्या नमुन्यांशी जुळली आहे. त्याने हल्ल्याच्या 11 दिवस आधी ती कार खरेदी केली होती. DNA चाचणीतून ती व्यक्ती दहशतवादी डॉ. उमर नबी असल्याचा खुलासा झाला आहे.
Summery
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा
स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर
कारमधील स्फोटात दहशतवादी उमर उपस्थित
