8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोग आणि DA वाढीची उत्सुकता शिगेला

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोग आणि DA वाढीची उत्सुकता शिगेला

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठी हालचाल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या 8वा वेतन आयोग कडे आशेने पाहत आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठी हालचाल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या 8वा वेतन आयोग कडे आशेने पाहत आहेत. कारण 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025 मध्ये संपुष्टात येणार असून, त्यानंतर 2026 च्या मार्च-एप्रिलमध्ये नव्या शिफारशी लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महागाई वाढत असताना पगारवाढीची अपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः महागाई भत्ता (DA) वाढीबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आशा आहे. सध्या त्यांना 58 टक्के DA मिळत असून, जानेवारी-जून 2026 या कालावधीसाठी 2 टक्क्यांची वाढ होऊन तो 60 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर ही वाढ जाहीर झाली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे.

केरळचा निर्णय चर्चेत

दरम्यान, केरळ सरकार ने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वीच मोठी भेट दिली आहे. राज्यातील महागाई भत्ता 25 टक्क्यांवरून थेट 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ मार्च 2026 च्या पगारात लागू होणार असून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे थकीत अरिअर्सही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पेन्शनधारकांनाही याचा थेट लाभ मिळणार आहे. केरळच्या या निर्णयामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष भारत सरकार कडे लागले आहे.

होळीपूर्वी गुडन्यूज?

मागील काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर महागाई भत्त्याची घोषणा सहसा मार्च महिन्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही होळीपूर्वी DA/DR वाढीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सरकारने 2 टक्के वाढ मंजूर केली, तर लाखो कर्मचाऱ्यांच्या घरगुती अर्थकारणाला मोठा दिलासा मिळेल. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास बेसिक पगारातही मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे 2026 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते. आता उत्सुकता केवळ एका अधिकृत घोषणेची आहे. होळीच्या सणातच आनंदाची बातमी मिळाली, तर ती लाखो कुटुंबांसाठी आर्थिक रंगांची उधळण ठरेल!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com