Gujarat : गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ, मुख्यमंत्री पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे
थोडक्यात
गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ
मुख्यमंत्री पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये कोण कोण?
गुजरातच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. आज (दि.16) मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी राजीनामा दिले आहेत. राजीनाम्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर या बैठकीत मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला.
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये कोण कोण?
कनुभाई देसाई – वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स (पार्डी)
बलवंतसिंग राजपूत – उद्योग, कामगार आणि रोजगार (सिद्धपूर)
ऋषिकेश पटेल – आरोग्य, कुटुंब कल्याण आणि उच्च शिक्षण (विसनगर)
राघवजी पटेल – शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय (जामनगर ग्रामीण)
कुंवरजीभाई बावलिया – पाणीपुरवठा आणि नागरी पुरवठा (जसदन)
भानुबेन बाबरिया – सामाजिक न्याय आणि महिला आणि बाल विकास (राजकोट ग्रामीण)
मुलुभाई बेरा – पर्यटन, वन आणि पर्यावरण (खंभलिया)
कुबेर दिंडोर – शिक्षण आणि आदिवासी विकास (संत्रामपूर एसटी)
नरेश पटेल – गंडदेवी म्हणून
बच्चूभाई खबर – देवगड बारिया
परशोत्तम सोळंकी – भावनगर ग्रामीण
हर्ष संघवी – मजुरा
जगदीश विश्वकर्मा निकोल म्हणून
मुकेशभाई झिनाभाई पटेल – ओलपाड
कुणवाजीभाई हलपती – मांडवी ( ST)
भिकूभाई चतुरसिंग परमार – मोडासा
उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज (दि.16) रात्री राज्यपालांना भेटून त्यांच्या मंत्रिमंडळाचे राजीनामे सादर करणार असून, हे पाऊल राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर भाजप किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवारी (दि.17) सकाळी 11:30 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिरात होणार आहे. या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित राहणार आहेत.