Bigg Boss 19 winner name leaked before the finale begins creating a stir
Bigg Boss 19 winner name leaked before the finale begins creating a stirBigg Boss 19 winner name leaked before the finale begins creating a stir

Bigg Boss 19 Winner : बिग बॉस 19 Finale पूर्वी विजेत्याचं नाव लिक; चाहत्यांमध्ये खळबळ

बिग बॉस 19 चं फिनाले आज संध्याकाळी 9 वाजता होणार असून, यावेळी सीझनचा अंतिम विजेता जाहीर केला जाईल. या सीझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Bigg Boss 19 Winner) : बिग बॉस 19 चं फिनाले आज संध्याकाळी 9 वाजता होणार असून, यावेळी सीझनचा अंतिम विजेता जाहीर केला जाईल. या सीझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. बिग बॉस 19 चे पाच अंतिम स्पर्धक निश्चित झाले आहेत, त्यापैकी एक स्पर्धक आज रात्री विजेतेपद मिळवेल. तथापि, फिनालेला काही तास उरले असतानाच विजेत्याचं नाव आधीच बाहेर आलं आहे.

सलमान खान या शोचे होस्ट आहेत, आणि तोच विजेतेपद जाहीर करतो. पण यावेळी सलमान खान नाव जाहीर करण्यापूर्वीच विजेतेपद लिक झालं. एका तंत्रज्ञानाच्या चुकमुळे, विकिपीडियावर बिग बॉस 19 च्या विजेत्याचं नाव प्रकाशित झालं. जेव्हा विकिपीडियावर "बिग बॉस 19 विजेता" म्हणून शोध घेतला, तेव्हा थेट गाैरव खन्ना याचं नाव दिसू लागलं. बिग बॉस 19 च्या पाच फायनलिस्टमध्ये प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमान मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. प्रत्येकाला त्याच्या आवडत्या स्पर्धकासाठी मतदान करण्याची धडपड आहे.

अशा परिस्थितीत, विकिपीडियावर विजेतेपदाचे नाव लिक होण्यामुळे काही उत्सुकतेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काहींनी विचारले आहे की, निर्मात्यांनी विजेते आधीच ठरवले आहेत का? आणि शेवटचं मतदान म्हणजे एक प्रकारचं नाटक आहे का? विकिपीडियावर प्रथम गाैरव खन्ना याचे नाव विजेता म्हणून दाखवले गेले होते, परंतु नंतर ते बदलून फक्त फायनलिस्ट म्हणून ठेवले. बिग बॉसच्या घरात गाैरव खन्ना एक धाडसी खेळताना दिसला होता, मात्र विजेतेपद जाहीर होण्यापूर्वीच विकिपीडियावर त्याचं नाव बाहेर आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com