bigg boss marathi fame dp dada opens up about his journey from influencer to furniture business
bigg boss marathi fame dp dada opens up about his journey from influencer to furniture business

Dhananjay Powar Instagram Post : "Bigg Boss केलाय म्हणून कुठे माज करत नाही फिरलो..." धनंजय पोवारचा रोख नेमका कुणावर?

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला डीपीदादा म्हणजेच धनंजय पोवार आज सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. पत्नी आणि आईसोबतचे त्याचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच चाहत्यांना आवडतात.
Published by :
Riddhi Vanne
Published on

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला डीपीदादा म्हणजेच धनंजय पोवार आज सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. पत्नी आणि आईसोबतचे त्याचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच चाहत्यांना आवडतात.

शोमधील सहभागानंतर धनंजयची ओळख आणखी वाढली, पण प्रसिद्धी मिळाली म्हणून तो बदललेला नाही, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. सोशल मीडियावर सक्रिय असणारा धनंजय नुकताच एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे.

धनंजय फक्त इन्फ्लूएन्सर नाही तर तो स्वतःचा फर्निचरचा व्यवसायही प्रामाणिकपणे सांभाळतो. दुकानात काम करणं, ग्राहकांना मटेरियल दाखवणं हे सगळं तो आजही स्वतः करतो. आपल्या कष्टांबद्दल बोलताना त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आपण श्रीमंत घरात जन्माला आलो नाही आणि यश मिळालं म्हणून गर्वही करत नाही.

त्याची ही साधी आणि मनापासून लिहिलेली पोस्ट नेमकी कुणासाठी होती, हे मात्र त्याने सांगितलेलं नाही. पण मेहनत, प्रामाणिकपणा आणि जमिनीवर राहण्याचा संदेश त्यातून नक्कीच मिळतो. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’मधील घडामोडींवरही धनंजय आपली मतं मांडताना दिसतो. अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील वादावर त्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

थोडक्यात

  1. ‘बिग बॉस मराठी’ सिझन 5 मधील धनंजय पोवार (डीपीदादा) घराघरात पोहोचला.

  2. शोमधील सहभागानंतर त्याची ओळख आणि लोकप्रियता वाढली.

  3. पत्नी आणि आईसोबतचे त्याचे मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात.

  4. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही तो बदललेला नाही, हे त्याने सिद्ध केले आहे.

  5. सोशल मीडियावर सक्रिय असलेला धनंजय नुकताच एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com