Bihar Bhavan : मुंबईत बिहार भवनला मनसेचा थेट विरोध; नवनिर्वाचित नगरसेवक यावर नाराज
यंदाच्या महापालिका निवडणुकीत मुंबई केंद्रस्थानी होती. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात पुढे आला आणि परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा सूरही दिसून आला. मात्र या सगळ्या घडामोडींनंतरही मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरे गटाकडे गेली नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवून पुढे गेला आणि महायुतीने बहुमत मिळवले.
दरम्यान, बिहार सरकारने मुंबईत भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याची घोषणा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला असून, मुंबईत असा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा नवनिर्वाचित मनसे नगरसेवकांनी दिला आहे. महागाई, स्थानिक प्रश्न प्रलंबित असताना परराज्याच्या इमारतींसाठी खर्च कशाला, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
प्रस्तावित बिहार भवन हे सुमारे 30 मजली, आधुनिक आणि पर्यावरणपूरक असणार आहे. मात्र या प्रकल्पावरून आता मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली असून, येत्या काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
थोडक्यात
यंदाच्या महापालिका निवडणुकीत मुंबई केंद्रस्थानी होती.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात पुढे आला.
परप्रांतीय विरुद्ध स्थानिक असा सूरही दिसून आला.
मात्र, या सर्व घडामोडींनंतरही मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरे गटाकडे गेली नाही.
भाजप सर्वाधिक जागा मिळवून पुढे गेला आणि महायुतीने बहुमत मिळवले.

