Bihar | Nitish kumar
Bihar | Nitish kumar Team Lokshahi

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक

गया येथील दुष्काळी परस्थितीचा आढावा घेणार होते नितीश कुमार
Published by :
Shubham Tate

Nitish Kumar : बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर येत आहे. या दगडफेकीत नितीश कुमार यांच्या ताफ्यातील तीन ते चार वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे दगडफेक झाली तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार हे ताफ्यात नव्हते. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात ही घटना घडली. जिथे काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे बिहार मध्ये चर्चांना उधान आले आहे. (Bihar Chief Minister Nitish Kumar's convoy stone pelted)

Bihar | Nitish kumar
अमरावतीमध्ये पुढचा खासदार भाजपचाचं बावनकुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

नेमकं काय घडलं ?

सोमवारी नितीश कुमार हे बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला आहे. गया येथील दुष्काळी परस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरने गयाला जाणार असले तरी, हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पाटणाहून गयाला जात होती. नितीश कुमार यांच्या सुरक्षतेचा ताफा नेमका पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर हा हल्ला झाला आहे. केवळ गाड्यांमध्ये केवळ कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही, पण गाडीच्या काचा फुटल्या आहेत. घटनेचे गाभीर्य ओळखून लागलीच सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांकडून परस्थिती नियंत्रणात करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com