Maharashtra Politics : ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप–शिंदे गटाचा निर्धार
Maharashtra Politics : ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप–शिंदे गटाचा निर्धारMaharashtra Politics : ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप–शिंदे गटाचा निर्धार

Maharashtra Politics : ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप–शिंदे गटाचा निर्धार; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंसमोर मोठे आव्हान

Maharashtra Politics : राज्यात निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे, आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्र येऊन आपली रणनीती ठरवताना दिसत आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Maharashtra Politics : राज्यात निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे, आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्र येऊन आपली रणनीती ठरवताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व दिलं जात आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार सामना होण्याची शक्यता आहे, आणि त्यातच ठाकरे बंधूंची एकत्र येणारी युती चर्चा सुरू आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत जागावाटप ठरल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील 207 जागांसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत, अशी माहिती राजकीय वर्तुळात आली आहे. यामुळे महायुतीच्या कडून तयारीला वेग आला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महायुतीतर्फे पुढील योजना ठरवण्यासाठी चर्चा जोरात सुरू आहेत. काही जागांवर अजून निर्णय होण्याची शक्यता आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल, असे समजत आहे. महापालिका निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2025 रोजी होईल, आणि निकाल 16 जानेवारीला जाहीर होईल. महायुतीतर्फे जागावाटपावर चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, आणि त्यावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे सध्याची राजकीय स्थिती अधिकच रंगतदार बनली आहे.

सद्याच्या घडीला, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अधिकृत जागावाटप जाहीर केलेले नाही. त्यामुळे महायुती लवकरच आपला प्रचार सुरू करण्यासाठी जागावाटप जाहीर करू शकते. 30 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली यादी जाहीर करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून विविध बैठका झाल्या आहेत आणि अजित पवार यांना त्याचे परिणाम आधीच सांगण्यात आले आहेत. ३० डिसेंबरच्या दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार याची अंतिम याद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com