ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

चिपळूण तालुक्यात शिरगाव पंचायत समिती गणासाठी भाजपकडून ऍड. नयना उदय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महानगरपालिका निवडणुकांतील यशानंतर आता भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात शिरगाव पंचायत समिती गणासाठी भाजपकडून ऍड. नयना उदय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना-भाजप युती कायम ठेवत ही घोषणा करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कायदेविषयक कामकाज आणि सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे नयना पवार यांची ओळख मजबूत असून, त्यांचा जनसंपर्कही प्रभावी मानला जातो. सामाजिक प्रश्नांची जाण आणि संघटन कौशल्य ही त्यांची मोठी ताकद आहे.

पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत नयना पवार यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली आहे. महापालिकेतील विजयानंतर आता जिल्हा परिषदेतही भाजप आपली पकड मजबूत करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com