भाजपा 'या' तारखेला सरकार स्थापन करण्याच्या तयारीत
Admin

भाजपा 'या' तारखेला सरकार स्थापन करण्याच्या तयारीत

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५८ जागा जिंकल्या.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५८ जागा जिंकल्या. आता १२ डिसेंबर रोजी भाजप राज्यात सातव्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी शुक्रवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

येत्या 12 डिसेंबरला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, त्याच दिवशी 20 कॅबिनेट मंत्रीही शपथ घेऊ शकतात. अशी माहिती मिळत आहे.

पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल हे २० कॅबिनेट मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, हर्ष सांघवी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हृषिकेश पटेल आणि गुजरातचे चीफ व्हिप पंकज देसाई राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com