Nagaland : मोठी बातमी ! नागालँडमध्ये भाजपाला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Nagaland : मोठी बातमी ! नागालँडमध्ये भाजपाला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

नागालँडमध्ये भाजपा- NDPP आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नागालँडमध्ये भाजपा- NDPP आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी नागालँडमध्ये सरकार स्थापन केलय मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये आता सर्वपक्षीय सरकार कारभार पाहणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच सरकार स्थापनेला सुरुवात झाली. राज्याच्या हिताच्या विचार घेऊन निर्णय घेतल्याची राष्ट्रवादीकडून माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देणार आहेत.

कोणत्याच विरोधी पक्षाला तेवढी संख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे सर्वांनीच भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपा आघाडीचं सरकार येणार आहे. राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com