Bihar Election Result : भाजप आघाडीवर, नितीश कुमारांची जादू पुन्हा प्रभावी; महिलाच ठरल्या ‘किंगमेकर’?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Bihar Election Result ) आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान हे दोन टप्प्यात 6 आणि 11 नोव्हेंबरला पार पडले. 243 जागांपैकी 122 जागांवर बहुमत आवश्यक आहे. बिहारमध्ये दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झालेले पाहायला मिळाले.
बिहार निवडणुकीचा आज फैसला होणार असून कोणाचे पारडे असणार जड ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच संपूर्ण देशाचे लक्ष या राजकीय लढतीकडे वळले आहे. सुरवातीच्या ट्रेंड्सनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. त्याखालोखाल जनता दल (युनायटेड) म्हणजेच JDU दुसऱ्या क्रमांकावर, तर राजद (RJD) तिसऱ्या स्थानी असल्याचे संकेत मिळत आहेत.
या घडामोडीमुळे बिहारच्या सत्तेत ‘मोठा फेरबदल’ होण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. महत्त्वाची माहिती अशी की बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे आपल्या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे अपडेट समोर आले आहे. दुसरीकडे, महुवामधून तेज प्रताप यादव हे तिसऱ्या स्थानी आहेत. या निवडणुकीत निकालात महिलांची भूमिका निर्णायक ठरत आहे.
महिला मतदारांनी पुन्हा एकदा निकालावर प्रभाव टाकल्याचे बोलले जात आहे. विशेषत: नितिश कुमार यांनी जाहीर केलेल्या महिला रोजगार योजनेतील महिलांच्या खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा करण्याचा निर्णय हा ‘गेम चेंजर’ ठरल्याचे म्हटलं जात आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 1.5 कोटी महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार सुरू करता आला. लाडकी बहिण योजनेचा फायदा एनडीएला झाल्याचे दिसतंय. स्पष्ट बहुमत मिळाले असून ध़डाकेबाज निकाल येताना दिसतोय.
Summery
लाडकी बहिण योजनेचा एनडीएला फायदा ?
बिहारमध्ये एनडीएचा बोलबाला
बिहारमध्ये भाजप बहुतेक जागांवर आघाडीवर
