Shiv Sena's Nirdhar Melawa: "ॲनाकोंडा साप मुंबईत येऊन गेला, त्याला...", उद्धव ठाकरें मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

Shiv Sena's Nirdhar Melawa: "ॲनाकोंडा साप मुंबईत येऊन गेला, त्याला...", उद्धव ठाकरें मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते.
Published by :
Prachi Nate
Published on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते. मतदार याद्यांतील वाढता गोंधळ आणि बोगस नावांच्या प्रकरणाचा मुद्दा यावेळी चांगलाच ऐरणीवर आला. या प्रकरणात पक्षातील पदाधिकाऱ्यांना सक्रिय भूमिका घेण्याचा स्पष्ट निर्देश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले,

“लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. सरकारच ठरवतंय कोण मतदान करणार आणि कोण नाही. हे लोकशाहीला गिळणारे कारस्थान आहे.” मुंबईतील काही मतदार याद्यांमध्ये 1200 नावं असून प्रत्यक्षात केवळ 300 घरं असल्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की मतदार यादीत प्रचंड बोगस नावे समाविष्ट करून लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे.

पदाधिकाऱ्यांना दिले थेट आदेश

“आजपासून प्रत्येक गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांनी मतदार यादी घेऊन घराघरात पडताळणी सुरू करा. चेहऱ्यानिशी मतदार खात्रीशीर असला पाहिजे. बोगस नावांना जागा नाही,” असा कठोर आदेश ठाकरे यांनी दिला. यासोबतच त्यांनी पुढील निवडणुकीत पोलींग एजंटकडे फोटोनिशी मतदार यादी असणे बंधनकारक राहील अशी काहीतरी व्यवस्था करावी असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले .

“बोगस मतदार मतदानाला आला तर बेलाशक परत पाठवा,” असा थेट इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. “मोदींना मुंबई गिळायची आहे. हा डाव नवीन नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “चहा विकणारे पंतप्रधान झाल्यावर चहावरच जीएसटी लावतात, हे कुठे ऐकलंय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोदींसह, गडकरी-फडवणीस यांच्यावर साधला निशाणा

भाजप नेते नितीन गडकरी यांना उद्देशून ठाकरे म्हणाले, “ नेहमी तूप पुरणपोळी असे म्हणणारे गडकरी, त्यांच्या तोंडून सावजी चिकन ऐकायला बरं वाटलं. नवीन भाजप कार्यकर्त्यांनी आता मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयातील सतरंज्या उचलाव्यात.” दरम्यान काँक्रीटीकरणाच्या निर्णयावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. “कंत्राटदारांची सुपारी घेऊन विकास साधताय.

अतिरिके आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला. कल्याणमधील काँक्रीटीकरणाची परवानगी आदानींना दिली, असा दावा करत त्यांनी शहरी नक्षलवादाच्या आरोपांवर सरकारला प्रत्युत्तर दिले. जे चहा विकून पंतप्रधान झाले त्यांनी चहा वर जीएसटी लावलाय. असे कुठे पंतप्रधान असतात का? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. एकूणच शिवसेनेचा आजचा निर्धार मेळावा आणि या मेळाव्यामधील उद्धव ठाकरे यांचे भाजपाविरोधी भाषण सध्या व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com