Kailash Vijayvargiya : "महिलांनी तोकडे कपडे घालू नयेत...", भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
भाजप नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोर मधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महिलांनी तोकडे कपडे घालू नयेत , त्या चांगल्या दिसत नाहीत मी अश्या महिलांसोबत फोटो सुद्धा काढत नाही. असं त्यांनी म्हटलं आहे .
इंदूर या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.महिलांनी "तोकडे कपडे" घालण्याच्या ट्रेंडला ते नकार देतात, ही सौंदर्याची परदेशी संकल्पना आहे आणि ती अत्यंत गलिच्छ आहे.भारतीय परंपरेला ही संस्कृती शोभणारी नाही. तोकडे कपडे घालणाऱ्या महिला शुर्पणखसारख्या दिसतात.असे ही ते म्हणाले.
शहर विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांच्या कपड्यांच्या निवडीशी संबंधित विधान केल्यावर काही प्रमाणात वाद निर्माण झाला.विदेशात लहान भाषण चांगले मानले जाते, जसे कमी कपडे घालणारी स्त्री सुंदर मानली जाते. पण मला तसे वाटत नाही,” असे ते म्हणाले.आपल्या भारतातील महिला देवीचे रूप आहेत आणि त्यांनी खूप चांगले कपडे घालावेत. चांगला मेकअप करावा चांगले दागिने घालावे आणि पूर्ण कपडे घालावे अशी स्त्री सुंदर मानली जाते,” असे ते पुढे म्हणाले.
लहान तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांसोबत मी सेल्फी किंवा फोटो ही काढत नाही असे ही ते म्हणाले. मात्र या वक्तव्यामुळे तृणमूल काँग्रेस संतप्त झाले आहेत." या नेत्यांची विचारसरणी समजत नाही ज्यांची भाषणे बहुतेकदा महिला, त्यांचे कपडे यांच्याविषयीच असतात . त्यांनी महिलांच्या मुद्द्यांवर संवेदनशीलता राखली पाहिजे."असे सांगत या प्रकरणी तातडीने कारवाई करत कैलास विजय वर्गीय यांच्या राजीनाम्याची मागणी तृणमूल काँग्रेस ने केली आहे.