आज भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर

आज भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती.

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. कागल, कोल्हापूर आणि पुणे अशा तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान, किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने आज कोल्हापुरात दाखल झाले. ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून सातारसाठी दुपारी दोनच्या सुमारास रवाना होणार आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावं. अंबाबाईचे दर्शन घ्यावं आणि आम्ही केलेल्या कामांचा देखील आढावा घ्यावा. आमचा एकही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे नेते माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com