नाशिकमध्ये भाजपाला धक्का; भाजपचे मालेगाव तालुक्यातील डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात
Admin

नाशिकमध्ये भाजपाला धक्का; भाजपचे मालेगाव तालुक्यातील डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात

नाशिक मालेगावमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे.

नाशिक मालेगावमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे मालेगाव तालुक्यातील डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात सामील झाले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे मोठे आंदोलन झाले, या संदर्भात अद्वय हिरे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवले होते. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले.

पालकमंत्री दादा भुसे यांना कट्टर व शक्तिशाली विरोधक म्हणूनही हिरे यांच्याकडे पाहिले जात होते. याच पार्श्वभूमीवर भाजपाला स्थान कमी होत असल्याने अद्वय हिरे यांनी गेल्या आठवड्यात हिरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईत घेतलेली भेट चर्चेत आली होती.

काही दिवसांपूर्वी मालेगाव परिसरात शेतकऱ्यांकडून मोठे जण आंदोलन उभारण्यात आले होते. 3 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावरही फडणवीस यांनी काहीही उत्तर दिले नव्हते. मालेगावात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप आणि शिंदे गटाने कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधला रोष वाढत होता.नुसार लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात दादा भुसे विरुद्ध हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com