गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुते यांनी ट्विट करत सांगितले...
विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचा घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी केला आहे. मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांनी मारकडवाडी गावात भेट दिली. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मारकडवाडी गावात येणार असल्याची माहिती मिळत आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी ही माहिती दिली आहे.
राम सातपुते म्हणाले की, माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता भाजपा नेते आ.गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे. जुलमी मोहिते पाटलांच्या विरोधातील संघर्षाचे शिलेदार व्हा. असे त्यांनी म्हटले आहे.