Taj Mahal : ताजमहाल पाडा! भाजपा आमदाराचे पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले ताजमहाल पाडून मंदिर बांधा
Admin

Taj Mahal : ताजमहाल पाडा! भाजपा आमदाराचे पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले ताजमहाल पाडून मंदिर बांधा

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने ताजमहाल पाडण्याचे मोदींना आवाहन केले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने ताजमहाल पाडण्याचे मोदींना आवाहन केले आहे. आमदार रुपज्योती कुर्मी म्हणाले की, ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताजमहाल त्वरित पाडण्याची विनंती करतो.

भाजप आमदार रूपज्योती कुर्मी यांनी केवळ ताजमहालच नाही तर कुतुबमिनारही पाडण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मुघल सम्राट शाहजहानचे पत्नी मुमताजवर खरेच प्रेम होते का, याची चौकशी व्हायला हवी. रुपज्योती कुर्मी यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर त्यांचे मुमताजवर प्रेम होते, तर मुमताजच्या मृत्यूनंतर त्यांनी आणखी तीन लग्ने का केली?

मुघल 1526 मध्ये भारतात आले, त्यानंतर त्यांनी ताजमहाल बांधला. शहाजहानने आपली चौथी पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधला. शाहजहानने एकूण ७ विवाह केले होते. रुपज्योती कुर्मीने सांगितले, मी पंतप्रधान मोदींना ताजमहाल आणि कुतुबमिनार त्वरित पाडण्याची विनंती करतो. जगातील सर्वात सुंदर मंदिरे बांधली पाहिजेत. या आमदाराने आपला महिन्याचा पगार मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचेही बोलले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com