भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार गेली चोरीला; रोहित पवार म्हणाले...

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार गेली चोरीला; रोहित पवार म्हणाले...

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील गोविंदपुरी भागातून कार चोरीला गेली आहे. कारचा ड्रायव्हर त्याच्या घरी जेवायला गेला असता ही कार चोरीला गेल्याचे समजते. चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांकडून कारचा शोध घेतला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, संपूर्ण देशाची सत्ता हाती असलेल्या #महाशक्तीच्या सर्वोच्च नेत्याच्या पत्नीचीच गाडी चोरीला जात असेल तर दिल्ली पोलिसांचा वापर काय फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला ताब्यात घेण्यासाठीच केला जातोय का? यावरून हेही स्पष्ट होतं की, जिथं महाशक्तीच्या मुखियाच्या पत्नीचीच गाडी सुरक्षित नाही तिथं देश कसा सुरक्षित राहणार? असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com