अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा भाजपाकडे, मुरजी पटेल यांना उमेदवारी?
Admin

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा भाजपाकडे, मुरजी पटेल यांना उमेदवारी?

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गट या विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार होता.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गट या विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार होता. मात्र आता शिंदे गटाची ही जागा भाजपने गेल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार रमेश यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार होता मात्र भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे इथे आता शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.

कोण आहेत मुरजी पटेल?

मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. पोटनिवडणुकीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याचं समजतं.

Lokshahi
www.lokshahi.com