Ravindra Chavan : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांचा पुन्हा धक्का! मनसेवर जोरदार हल्ला, डोंबिवलीतील नेते भाजपच्या दिशेने

Ravindra Chavan : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांचा पुन्हा धक्का! मनसेवर जोरदार हल्ला, डोंबिवलीतील नेते भाजपच्या दिशेने

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा राजकीय गोंधळ माजवला आहे. शिवसेनेनंतर आता मनसेला देखील धक्का दिला असून, डोंबिवलीतील काही मोठे नेते भाजपच्या गळाला जोडले गेले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा राजकीय गोंधळ माजवला आहे. शिवसेनेनंतर आता मनसेला देखील धक्का दिला असून, डोंबिवलीतील काही मोठे नेते भाजपच्या गळाला जोडले गेले आहेत. आज सकाळी सकाळी ९ वाजता, रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर मैदानाजवळील गावदेवी मंदिर परिसरात भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला.

भाजपच्या या नव्या धोरणामुळे डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविंद्र चव्हाण यांचा हा धक्का तंत्र आता मनसेसह इतर विरोधकांवरही दबाव निर्माण करणार आहे. डोंबिवलीसह आसपासच्या भागातील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश भाजपसाठी मोठा विजयसंदेश ठरणार आहे. या नव्या घडामोडींनी मनसेच्या डोंबिवली प्रदेशातील कार्यकर्त्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, मनसे या राजकीय धक्क्याला कसा प्रत्युत्तर देईल. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते नव्या योजनेसह पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश सुरू ठेवण्याची तयारी करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com