Ravindra Chavan: राजकारणात उलथापालथ! 2 डिसेंबरनंतर महायुतीत मोठा स्फोट? रवींद्र चव्हाणांच्या संकेतांनी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षांतर करणे सुरू केले आहे, ज्यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपातील प्रवेश घेणाऱ्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली, तर शिवसेनेचे निलेश राणे यांनी भाजपावर पैसे वाटण्याचा आरोप केला आहे. या सर्व आरोपांवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले.
आज जळगावमध्ये प्रचार करत असताना, रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर बोलताना काहीही सांगण्याचे टाळले. "माझ्या कामात 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्या नंतर यावर बोलू," असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी निलेश राणे यांच्या आरोपांना खोटे ठरवले. महायुतीतील सध्याच्या परिस्थितीवरून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 2 डिसेंबरनंतर काय घडणार? महायुतीत काही मोठे बदल होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

