संजय राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय -  नारायण राणे

संजय राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय - नारायण राणे

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी नारायण राणे या महोत्सवाच्या व्यासपीठावरत बोलत होते.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी नारायण राणे या महोत्सवाच्या व्यासपीठावरत बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे. अशा इशारा दिला आहे.

नारायण राणे म्हणाले की, मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते. हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. असे राणे म्हणाले.

यासोबतच मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले. ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय. असे म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com