Yoges Kadam at Massajog : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट

त्यांना कडक शिक्षा होणार असे आश्वासन कदम यांनी दिले.
Published by :
Shamal Sawant

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी योगेश देशमुख यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि लेक वैष्णवी शिंदे यांच्याशी संवाद साधला.

संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने देखील शंका असलेल्यांना सहआरोपी करण्याची मागणी कदम यांच्याकडे केली आहे. त्यावर ज्यांनी सहकार्य केले त्यांना कडक शिक्षा होणार असे आश्वासन कदम यांनी दिले. दुसऱ्या तालुक्यातील लोक इथं येऊन दहशत माजवत असतील तर त्यांना डायरेक्ट आत मध्ये टाका, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानेच आज इथे आलो आहे. शिंदे साहेबांचं या प्रकरणावर लक्ष आहे, शिंदेसाहेब देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत . त्यांचा हा संदेश घेऊनच मी इथे आलो आहे, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोपींना शिक्षा होण्याबद्दल काय म्हणाले योगेश कदम ?

या प्रकरणाबाबत मी शिंदे साहेबांसोबत चर्चा करणार आहे, माझ्या स्तरावरचे आदेश तर मी दिलेच आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला, जायचा तसाच न्याय दिला जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com