ताज्या बातम्या
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक; वाहतुकीत करण्यात आले 'हे' बदल
दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
थोडक्यात
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक
डोंगरगाव कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक
दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक असणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर डोंगरगाव कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी आजपासून तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरूनच सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही दुपारी 3नंतर पूर्ववत करण्यात येणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.