BMC Budget 2025: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार?

BMC Budget 2025: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार?

आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मागील वर्षात तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत विविध योजना आणि सुविधांसाठी तरतूद या अर्थसंकल्पात असेल अशी माहिती मिळत आहे.

त्यामुळे आता अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अर्थसंकल्पात काय नेमकं विशेष मांडण्यात येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com