BMC CAG Audit 2023 : बीएमसीचा कॅग अहवाल सादर
Admin

BMC CAG Audit 2023 : बीएमसीचा कॅग अहवाल सादर

बीएमसीचा कॅग अहवाल आज सादर करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बीएमसीचा कॅग अहवाल आज सादर करण्यात आला आहे. हा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केला. बीएमसीतील 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हणजेच कोरोना काळात खर्च झालेल्या नऊ विभागांचा ऑडिट केला आहे. तो साधारणपणे 12000 कोटी रुपयांचा आहे.

या अहवालामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.मुंबई महापालिकेला १२ हजार कोटींच्या कामाचे कॅग कडुन ऑडिट करण्यात आले आहे. यात निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मान्यता नसताना बीएमसीने कामे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही कराराशिवाय कामे केल्याने महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा फक्त ट्रेलर असल्याचं उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत सांगून खरा पिक्चर बाकी आहे. असे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com